रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! शैक्षणिक शिष्यवृत्तीपासून मुकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी

by India Darpan
जून 23, 2024 | 3:50 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 104


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. महाडीबीटी पोर्टलवर ‘राइट टू गिव्हअप’चा पर्याय निवडल्याने शैक्षणिक शिष्यवृत्तीपासून मुकलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती रक्कम पुन्हा मिळण्याची संधी मिळणार आहे. संबंधित अर्ज रिव्हर्ट करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार अशा विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत मुदत दिली आहे.

राज्य शासनाने शिष्यवृत्तीच्या लाभार्थी विद्यार्थ्यांना या वर्षी प्रथमच ‘राइट टू गिव्हअप’चा पर्याय उपलब्ध करून दिला होता. स्वेच्छेने शिष्यवृत्तीची रक्कम अस्वीकार करण्यासाठी हा पर्याय दिला होता. केंद्र शासनाच्या गॅस सिलिंडरच्या अनुदानासंदर्भात अशा स्वरूपाची योजना यापूर्वी राबविण्यात आली आहे. या धर्तीवर शिष्यवृत्तीसंदर्भात पर्याय उपलब्ध करून दिला होता. मात्र काही विद्यार्थ्यांनी चुकून या पर्यायाची निवड केली. त्यामुळे त्यांच्या शिष्यवृत्ती बाबत प्रश्न उपस्थित झाले होते. यासंदर्भात त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून तसेच राज्यभरातील लोकप्रतिनिधींकडून शासनास करण्यात आली होती. यासंदर्भात सामाजिक न्याय विभागाने दखल घेत व या प्रकरणी विविध ठिकाणी सातत्याने पाठपुरा करत सूचना जारी करताना या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त करून घेण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.

राइट टू गिव्हअप’ पर्याय निवडून शिष्यवृत्तीच्या रद्दबातल झालेल्या अर्जाच्या पुनर्स्थापनेची प्रक्रिया निर्धारित मुदतीत करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अनावधानाने अथवा नजरचुकीने हा पर्याय निवडल्याने शिष्यवृत्तीचे अर्ज रद्दबातल झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचा अर्ज ‘रिव्हर्ट बॅक’ करायचा आहे. त्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत दिली आहे. अशा विद्यार्थ्यांने महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधायचा आहे. यानंतर प्राचार्य लॉगइनमधून अर्ज रिव्हर्ट बॅक करून घ्यायचा आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्याची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांची असेल. रिव्हर्ट बॅक झालेला अर्ज याच मुदतीत विद्यार्थ्यांच्या लागइनमधून ऑनलाइन फेरसादर करणे आवश्यक राहील, असेही विभागाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात काही अडचण उद्भवल्यास संबंधितांनी जिल्ह्याचे सहय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

काँग्रेस, राष्ट्रवादीने काम न केल्याचा खा. राऊत यांचा आरोप

Next Post

बस झाडावर आदळल्याने ३० प्रवासी जखमी…पुणे जिल्ह्यातील घटना

Next Post
Untitled 105

बस झाडावर आदळल्याने ३० प्रवासी जखमी…पुणे जिल्ह्यातील घटना

ताज्या बातम्या

Maha Gov logo 07 1 1024x512 1

पहलगाम दहशतवादी हल्ला: राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरीत

जून 1, 2025
Untitled 1

हैद्राबाद येथे थायलंडची ओपल सुचाता ठरली यंदाची मिस वर्ल्ड….जगभरातून १०८ स्पर्धकांनी घेतला होता सहभाग

जून 1, 2025
Untitled

पुण्यात मोठा अपघात…मद्यधुंद कारचालकाने MPSCच्या १२ विद्यार्थ्याना उडवलं

जून 1, 2025
बायोडेव्हर्सिटी पार्क 4 1024x682 1

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये….दिवसभर या विविध कार्यक्रमांचे आयोजन

जून 1, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी क्रोधावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, १ जूनचे राशिभविष्य

मे 31, 2025
प्रातिनिधिक फोटो

मध्य रेल्वेने राज्यातील या स्थानकावरील गाड्यांच्या वेळेत केली सुधारणा….

मे 31, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011