इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
तपास यंत्रणांच्या मदतीने विरोधी पक्षातील नेते फोडायचे ही भाजपची जुनी रणनीती आता भाजपच्या सहकारी पक्षांची सुद्धा सवय बनलेली आहे. त्यातूनच दबाव टाकण्यासाठी बिद्री कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांच्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने खोटी कारवाई केली.. या कारवाईचा जाहीर निषेध आमदार रोहित पवार यांनी केले आहे.
हा निषेध करतांना त्यानी माझ्यावरही अशाच प्रकारे प्रदूषण नियंत्रण बोर्ड, ईडीच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. एवढे होऊनही मी सरकारच्या विरोधात बोलायचे थांबवत नाही म्हणून माझ्या आणखी एका कारखान्यावर कारवाई करण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरु आहेत, कदाचित लवकरच कारवाई केली जाईल. पण सत्ताधाऱ्यांच्या या दबावालास्वाभिमानी मराठी माणूस कधीही बळी पडला नाही आणि पडणारही नाही.
असेही त्यांनी म्हटले आहे.
यावेळी त्यांनी आता सरकारचे ३-४ महिने राहिले आहेत, त्यामुळे सरकारने तपास यंत्रणाच्या माध्यमातून खोटी कारवाई करण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याच काम केलं, तर ते योग्य ठरेल असा चिमटाही त्यांनी काढला आहे.