इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
परीक्षेच्या एक दिवस आधी NEET चा पेपर मिळाला असल्याची माहिती अटक केलेल्या विद्यार्थ्याने बिहार पोलिसांना दिल्यामुळे चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. या मुलाने पोलिसांनी दिलेला जबाब समोर आला असून त्यात त्याने एक दिवस अगोदर जे प्रश्न दिले तेच परिक्षेला आल्याचे सांगून आपला गुन्हा कबूल केला आहे.
या विद्यार्थ्यांने पोलिसांनी दिलेल्या जबाबत असे म्हटले आहे, माझे नाव अनुराग यादव, वय २२ हे आहे. शास्त्रीनगर पोलीस ठाण्यातील निरीक्षकांसमोर कोणतेही भय, दबाव किंवा लोभ न बाळगता माझे स्पष्टीकरण देत आहे. मी कोटा येथील ॲलन कोचिंग सेंटरमध्ये राहून NEET परीक्षेची तयारी करत होतो. माझे काका सिकंदर पी. यादवेंदू नगरपरिषद, दानापूर येथे कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत. मला माझ्या काकांनी सांगितले होते की NEET परीक्षा आहे, कोटाहून परत ये. परीक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. मी कोटाहून परत आलो. त्यानंतर माझ्या काकाने मला ४ मे रोजी रात्री अमित आनंद व नितीशकुमार यांच्याकडे सोडले. या ठिकाणी नीट परिक्षेच प्रश्न व उत्तर दिले गेले. त्यानंतर रात्री ते प्रश्न व उत्तर पाठ केले. माझे सेंटर डी.वाय. पाटी स्कुलमध्ये होते. मी परिक्षेला गेल्यानंतर जे प्रश्न रात्री दिले होते. तेच प्रश्न आले. त्यानंतर परीक्षनंतर पोलिस मला पकडून घेऊन गेली. मी गुन्हा कबूल केला.