इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधानसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी असा सामना होईल असे वाटत असतांना आता आरक्षणावरुन मराठा व ओबीसी नेत्यांनी या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केल्यामुळे राजकीय पक्षांना धक्का बसणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने आरक्षण दिले नाही तर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. त्यांनी यावेळी १२७ जागांवर पहिला सर्व्हे झाला असून मी स्वत: निवडणूक लढवणार नसल्याचेही सांगितेल. लवकरच दुसरा सर्वे करु असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी ६ जुलैपासून मराठवाड्यात प्रत्येक जिल्ह्यात जनजागृती रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती दिली.
जरांगे यांच्या घोषणेनंतर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन निवडणूक लढवणार असतील तर आम्ही त्यांच्या विरोधात उमेदवार देऊ. १९९ मतदार संघात सर्व्हे पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.