नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील नालंदा अवशेष स्थळी भेट दिली. मूळ नालंदा विद्यापीठ हे जगातील पहिल्या निवासी विद्यापीठांपैकी एक मानले जाते. २०१६ मध्ये नालंदा विद्यापीठाचे अवशेष संयुक्त राष्ट्र संघ वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले होते.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले; “नालंदा उत्खननात सापडलेल्या अवशेष स्थळाला भेट देणे अविस्मरणीय होते. प्राचीन काळच्या जगातील विद्येच्या सर्वात मोठ्या केंद्रांपैकी एका स्थळाला भेट देण्याची ही संधी होती. हे स्थळ एकेकाळी येथे बहरलेल्या विद्धतेच्या भूतकाळाची झलक दाखवते.नालंदा विद्यापीठाने एक बौद्धिक चैतन्य निर्माण केले आहे जे आजही आपल्या देशात निरंतर वृद्धिंगत होत आहे.”