नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भद्रकाली परिसरातील पोलीसांसमोर दोघांना जमावाने मारहाण केल्याची घटना घडली. या हल्यात दोन्ही तरूण जखमी झाले आहेत. डॉ. झाकीर हुसैन रुग्णालया शेजारील उद्यानालगत असलेल्या पाण्याच्या टाकीखाली कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गोवंश जनावरांची सुटका करण्याच्या प्रयत्नात हा हल्ला झाला.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (दि. १८) दुपारी एक वाजेच्या सुमारास भद्रकाली पोलिसांच्या हद्दीत एका गटाने केलेल्या हल्यात श्रीकांत नंदकुमार क्षत्रीय (वय ३४, रा. उत्तमनगर) व निलेश सदाशिव गांगुर्डे (२३, रा. पाटीलनगर, सिडको) हे दोघे तरूण जखमी झाले.
टीप दिल्याचा संशय
पोलीसांना टीप दिल्याच्या संशयातून जमावाने हा हल्ला केल्याचे बोलले जात असून या घटनेने परिसरात उशीरा पर्यंत तणाव होता. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
खूनाचा गुन्हा दाखल
दोघांवरही जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, पायाला, हाताला, छातीला जबर मार लागल्याची नोंद वैद्यकीय अधिका-यांनी केली. याप्रकरणाची भद्रकाली पोलिसांनी गंभीर दखल घेत जमावाविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला आहे.