शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पश्चिम बंगालमध्ये रेल्वे अपघात, एक्स्प्रेसला मालगाडीची धडक…५ जणांचा मृत्यू, २५ जण जखमी

by India Darpan
जून 17, 2024 | 11:09 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 79

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग जिल्हयात सिलीगुड़ी उपमंडल अंतर्गत रंगपानी स्टेशन जवळ रुइधासा येते आज एका मालगाड़ीने कंचनजंगा एक्सप्रेसला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहे. तर रेल्वेचे मागील तीन डब्यांचे नुकसान झाले आहे.

सोमवारी सकाळी नऊ वाजता ही दुर्घटना घडली. कांचनगंगा एक्स्प्रेसला एका मालगाडीने मागून धडक दिली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच २५ प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेनंतर बचाव आणि मदत कार्य सुरु केले आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, घटनास्थळी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम पोहचली आहे. त्यांनी मदत आणि बचावकार्य सुरु केले आहे. रेल्वे आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्याच आल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या भीषण अपघातावर शोक व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, कांचनजंगा एक्स्प्रेसला मालवाहतूक करणाऱ्या ट्रेनने धडक दिल्यामुळे अपघात झाला. आता घटनास्थळी बचाव आणि मदत कार्य सुरु केले आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, डॉक्टर, रुग्णवाहिका आणि आपत्ती व्यवस्थापन पथक अपघाताच्या ठिकाणी पोहचले आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

रंगपाणी आणि निजबारी स्थानकांदरम्यान ही घटना घडली आहे. आगरतळा ते सियालदहला जाणारी ट्रेन क्रमांक 13174 कांचनजंगा एक्स्प्रेसला मागून मालगाडीने धडक दिली. त्यात अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत.

Unfortunate accident in NFR zone. Rescue operations going on at war footing. Railways, NDRF and SDRF are working in close coordination. Injured are being shifted to the hospital. Senior officials have reached site.

— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) June 17, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यातील शाळा- महाविद्यालयातच आता थेट मिळणार एसटी पास, अशी आहे मोहिम

Next Post

पोलीस भरती आणि SRPF भरतीची मैदानी परीक्षा एकाच दिवशी…आता दिली ही सवलत

Next Post
Maharashtra Police e1705145635707

पोलीस भरती आणि SRPF भरतीची मैदानी परीक्षा एकाच दिवशी…आता दिली ही सवलत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011