इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिकच्या ललित पाटील ड्रग्स प्रकरणात नाशिकचे पालमंत्री दादाजी भुसे यांचा सहभाग असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. त्यानंतर या प्रकरणी मंत्री दादाजी भुसे यांनी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना बदनामी केल्या संदर्भात त्यांच्या वकीलांमार्फत नोटीस पाठवली आहे.
या बदनामी केल्याच्या भाष्या प्रकरणी पुरावे द्यावे अन्यथा माफी मागावी असे नोटीसमध्ये म्हटले आहे. आता या नोटीसला सुषमा अधारे काय उत्तर देतात हे महत्त्वाचे आहे. याबाबत अगोदरच दादा भुसे यांनी कायदेशीर कारवाई करणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर ही नोटीस पाठवली आहे.
याअगदोर दादा भुसे यांनी खा.संजय राऊत यांच्या विरुध्द मानहानीचा दावा मालेगाव येथे न्यायालयात केला आहे. कालच त्याची सुनावणी होती. आता त्या पाठोपाठ आता सुषमा अंधारे यांच्यावरही दादा भुसे मानहानीचा दावा दाखल करण्यासाठी ही नोटीस पाठवली आहे.