इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक रंगात आली असतांना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चलनातून बाद झालेल्या नोटा बदलण्यासाठी थेट एकाने तांत्रिकाची मदत घेतल्याच्या प्रकाराचा भांडाफोड पोलिसांनी केला आहे. ग्वाल्हेरच्या गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली आहे. २०१६ मध्ये चलनातून बाद झालेल्या जुन्या १००० आणि ५०० रुपयांच्या नोटांचा साठा जप्त केल्या असून एकाला गजाआड केले आहे. या आरोपींच्या ताब्यातून ४७ लाख रुपयांचे जुने चलन जप्त केले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, एक व्यक्ती या जुन्या नेटा घेऊन दुचाकीवरुन जंगलात जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी या व्यक्तीला सकाळी मुरैना रोडवर थांबवले. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी त्याला पाठलाग करुन पकडले. त्याची तपासणी केल्यानंतर त्याच्याकडे ४७ लाख ५०० व १००० रुपयाच्या नोटा मिळाल्याचे पोलिस अधिक्षक राजेश सिंह चंदेल यांनी सांगितले.
तांत्रीकाकडे जात होता
या व्यक्तीची तपासणी केल्यानंतर हा व्यक्ती नोटा बदलण्यासाठी एका तांत्रीकाकडे जात होता. फोनवरुन तांत्रिकने दावा केला होती की जिन्नला वश करुन हवे ते काम त्याच्याकडून करुन घेता येते. त्यामुळे मुरैना येथील राहणारा सुल्तान करोसिया हा या तांत्रीकडे जात होता. पण, अगोदरच तो पोलिसांच्या ताब्यात सापडला. त्यामुळे जिन्नची जादू त्याला काही बघता आली नाही.