इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई: आजच्या सोशल मीडियाच्या काय घडेल याचा नेम नाही, विशिष्ट तरुणाई सोशल मीडियामध्ये इतकी गुरफटली आहे की, त्यातून मग एकमेकांविषयी आकर्षण निर्माण होऊन लोभ वाढत जातो आणि गुन्हेगारी ही वाढते, असाच प्रकार मुंबईत घडला. एका तरुण-तरुणीचे सोशल मीडियावर इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली. ओळखीची रूपांतर प्रेमात झाले, प्रेमातून मग त्यांच्या अश्लील गप्पा सुरू झाल्या या गप्पा त्या लोभी तरुणांने रेकॉर्ड केल्या आणि ते रेकॉर्डिंग करीत असतानाच त्याचा गैरफायदा घेत त्या स्वार्थी तरुणाने त्या बेसावध तरुणीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आता गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास सुरू आहे.
हा गैरप्रकार मुंबईतील अंधेरीतील रहिवासी असलेल्या व वेल्डरचे काम करणाऱ्या अबू झा अन्सारी (२५) तरुणांनी केला, त्याने मुंबईतील वांद्रे परिसरात राहणाऱ्या २९ वर्षीय तरुणीशी ओळख निर्माण करून सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण करीत तिच्याशी संवाद साधला आणि त्याच माध्यमातून दिला ब्लॅकमेल केले. अन्सारीने अशाप्रकारे अन्य तरुणींनाही ब्लॅकमेल केल्याचा संशय असून पोलीसांना असून ते याची चौकशी करत आहे.
अशी झाली ओळख
अन्सारी व तरुणीची इंस्टाग्रामवरून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांमध्ये अश्लील संवाद सुरु झाले. पुढे दोघांमधील खासगी व्हिडीओ कॉलचे रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत अन्सारीने तरुणीकडे पैशांची मागणी केली. पहिले १५ हजार रुपये घेतले. नंतर ७ हजारांची मागणी केली. पैसे दिले नाही तर व्हिडीओ व्हायरल करण्याच्या धमकीमुळे तरुणीने पोलिस स्थानकात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी अबू झा अन्सारी (२५) विरुद्ध याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी खंडणीचा गुन्हा नोंदवला. १ मार्च ते २० ऑक्टोंबर दरम्यान ही घटना घडली.