इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे हिट ॲन्ड रन प्रकरणामध्ये राजकीय दबावाखाली आरोपीचे रक्ताचे नमुने बदलून आरोपी दारू न पिल्याचा अहवाल तयार करण्याचे प्रयत्न झाले, हे उघड झाले आहे. आता मृतकांच्या Viscera Report मध्ये Alcohol +ve यावे याकरिता पूर्णपणे तयारी झाली असल्याचा खळबळजनक दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
हा दावा करतांना देशमुख म्हणाले की, जेणेकरुन या प्रकरणामध्ये मृत झालेले मोटरसायकल वरील तरुण तरुणी हे दारु पिऊन होते आणि त्यांच्यामुळेच हा अपघात झाला, असे न्यायालयात सिद्ध करता येईल. त्यामुळे विशाल अग्रवालचा मुलगा लवकर सुटेल, अशा पध्दतीने प्रयत्न सध्या सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुणे अपघात प्रकरणात एकुणच सरकारी यंत्रणेचा गैरप्रकार अगोदरच उघड झाला. त्यानंतर अजूनही ते थांबत नसल्यामुळे अनिल देशमुख यांनी हा खळबळजनका दावा करुन पुन्हा सरकारी यंत्रणेचे पितळ उघडे पाडले आहे.