इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
माजी शालेय शिक्षणमंत्री व काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, आज संध्याकाळी ५.५० च्या चर्चगेट बोरिवली एसी लोकलने प्रवास केला. ट्रेनच्या AC मधून बरंच पाणी टपकत होतं, जणू पाऊस पडत होता. जमिनीवर पाणी साचले होते. सर्व प्रवाशांना त्रास होत होता, त्यांचे सामान ओले होत होते असे सांगत संताप व्यक्त केला.
या ट्विटमध्ये त्यांनी पुढे म्हटले आहे की, माझी सहकारी, मुंबईच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी ६ ऑक्टोबर रोजी याच ट्रेनबद्दल तक्रार केली होती, परंतु आजपर्यंत काहीही बदलले नाही. एसी मधून हवा नव्हती, बोरिवलीला पोहोचेपर्यंत आम्ही घामाने भिजलो होतो.
एसी ट्रेनचे तिकीट इतर सेवांच्या तुलनेत खूप महाग आहे, जेव्हा प्रवाशांकडून इतके पैसे घेतले जातात, तेव्हा सर्व सुविधा देणे रेल्वे प्रशासनाचे कर्तव्य आहे. माझी मागणी आहे की @RailMinofIndia ने मुंबईच्या सर्व एसी लोकल ट्रेनचे सर्वेक्षण करावे आणि सुविधा लवकरात लवकर दुरुस्त कराव्यात.