इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील ६ मंत्र्यांनी शपथ घेतली. यात भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर उत्तर मुबई मतदारसंघाचे खासदार पीयूष गोयल यांनी केंद्रीय कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांना स्वतंत्र प्रभार मिळाला. तर आणखी ३ खासदारांना राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली. त्यात रामदास आठवले, रक्षा खडसे व मुरलीधर मोहोळ यांचा समावेश आहे.
स्वतंत्र प्रभार मिळालेले प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा विजय मिळवला आहे. तसेच त्याआधी त्यांनी आमदारकीचीदेखील हॅटट्रीक मारली होती. भाजपच्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या रक्षा खडसे या तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे.भाजपचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित तरुण खासदार मुरलीधर मोहोळ यांना राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीदेखील आज राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.