इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवरात्र उत्सवाचे निमित्ताने अष्टमीला रात्री १२ वाजे नंतर ज्या मुलींनी जिल्हा रुग्णालयात जन्म घेतला त्या मुलींच्या आई व वडील नवजात बालीकांचा सन्मान करण्यात आले. श्री जन्माचे स्वागत सन्मानाने व्हावे या साठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील पीसीपीएनडीटी कार्यक्रमांतर्गत दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो. आज ४ मतांचा सन्मान करण्यात आला.
प्रसूती पश्चात कक्ष रांगोळी, तोरण, फुगे लावून सजवण्यात आला होता. सनई वादन, पेढ्यांचे वाटप करून वॉर्ड मध्ये करुन सोहळा साजरा करण्यात आला. सदर सोहळ्यात अष्टमीला ज्यांना मुलगी झाली अशा मातेस साडी, ओटी तीचे औक्षण करून नवजात बालीकेस नवीन कपडे, वडीलांना शाल देउन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी आशीमा मित्तल यांच्या शुभहस्ते सन्मानीत करण्यात आले. मित्तल यांनी श्री जन्माचे स्वागत आनंदाने करा असे आवाहन केले व श्री जन्म झालेल्या पालकास शुभेच्छा दिल्या.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, अती. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ प्रमोद चौधरी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सूर्यवंशी, डॉ. किरण पाटोळे स्त्रीरोग तथा विभाग प्रमुख पदव्युत्तर महाविद्यालय, डॉ. उत्कर्ष दुधाडीया, डॉ. रोहन बोरसे, डॉ. प्रतीक भांगरे, डॉ.बाळू पाटील, मेट्रन शुभांगी वाघ, अँड सौ सुवर्णा शेपाळ, डॉ. राहुल हाडपे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, नर्सिंग स्टाफ व इतर कर्मचारी उपस्थित होते.