नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रस्त्याने पायी जाणा-या महिलेची वाट अडवित एकाने विनयभंग केल्याची घटना द्वारका परिसरातील शंकर नगर भागात घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शहारूख फरीद कुरेशी (रा.अमरधामरोड,नानावली) असे महिलेचा विनयभंग करणा-या संशयिताचे नाव आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार रविवारी (दि.२) सकाळी अकराच्या सुमारास गुमशहा बाबा दर्गा कडून शंकरनगरच्या दिशेने पायी जात असतांना संशयिताने तिचा पाठलाग करून वाट अडविली.
यावेळी संशयिताने तिचा विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.