इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणुकीत राज्यात राष्ट्रवादी अजित पवाराला मोठा धक्का बसणार असल्याचा अंदाज काल एक्झिट पोलने व्यक्त केला. त्यानंतर अजित पवार गटात निराशेचे वातावरण असतांना आज अरूणाचल प्रदेश विधानसभेच्या निकालानंतर मात्र दिलासा मिळाला आहे.
येथील निवडणुकीत अजित पवार गटाने तीन जागा जिंकल्या आहे. तर तीन जागा थोड्या मताने गमावल्या आहे.नामसांग विधानसभा मतदार संघात नगोंगलीन बोई हे ५६ मतांनी पराभूत झाले. तर खोणसा पश्चिम विधानसभा मतदार संघात यांग सेन माटे हे ८०४ मतांनी तर पक्के केसांग विधानसभा मतदार संघात टेकी हेमू ८१३ मतांनी पराभूत झाले.
गेल्या महिन्यात १९ एप्रिलला विधानसभेच्या ६० जागांसाठी मतदान पार झाले होते. यानंतर रविवारी मतमोजणी झाली. या निकालात तीन उमेदवार विजयी झाले आहेत. टोको तातूंग, लिखा सोनी आणि निख कमिन हे उमेदवार विजयी झाले आहेत. अजित पवार गटाकडून एकूण १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. ३ उमेदवारांचा थोडक्यात पराभव झालाय. तर ३ उमेदवार जिंकून आले आहेत.
अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने आघाडी ६० पैकी ४६ जिंकल्या आहे. त्यात १० जागा अगोदरच बिनविरोध झाल्या होत्या. गेल्या वेळी भाजपने ४२ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे भाजपला येथे सरकार स्थापन करण्यासाठी इतर पक्षांची फारशी गरज नाही. पण, महाराष्ट्रात भाजपसोबत राष्ट्रवादी असल्यामुळे त्याचा फायदा येथील आमदारांना मिळू शकतो.
अजित पवारांनी दिली ही प्रतिक्रिया
अरुणाचल प्रदेश येथे पार पडलेल्या विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ३ उमेदवार निवडून आल्याबद्दल मी तिन्ही उमेदवारांचं मनापासून अभिनंदन करतो. हा विजय ऐतिहासिक असून या निवडणुकीत अरुणाचल प्रदेशमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेले अथक परिश्रम आज फळास आले आहेत. त्यामुळे त्यांचं देखील अभिनंदन करतो. विशेष बाब म्हणजे एकूण मतांच्या १०.०६ टक्के मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदरात पडली, याचा फार आनंद आहे. अरुणाचल प्रदेशच्या मतदार राजानं आमच्या पक्षाच्या उमेदवारांवर दाखवलेला विश्वास हीच आमची ताकद असून याच ताकदीच्या जोरावर यापुढे विकासाची गंगा अरुणाचल प्रदेशमध्ये वाहेल असा शब्द देतो.