इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
देशभरात एक्झिट पोल शनिवारी जाहीर झाल्यानंतर झी मीडियाच्या AI एक्झीट पोल रविवारी जाहीर करण्यात आली. या AI एक्झीट पोल नुसार महायुतीच्या जागा ४१ वरुन २५ ते ३४ च्या दरम्यान घसरण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीच्या जागा ५ वरुन १५ ते २१ वर जाण्याची शक्यता आहे.
या पोलनुसार भाजप आघाडीला ३१० जागा तर इंडिया आघाडीला १८८ जागा मिळू शकतात. तर इतर पक्षांना ४५ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
झी २४ तासच्या एआय एक्झिट पोलमध्ये थेट आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेण्यात आली आहे. तब्बल १० कोटी लोकांची सँम्पल साईज असलेला हा देशातला सगळ्यात मोठा एक्जिट पोल ठरला आहे. हा एक्जिट पोल तयार करताना AIचा वापर करुन सोशल मीडियावरील ३२ लाख पोस्टचं सविस्तर विश्लेषण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे देशातल्या १ हजार उमेदवारांच्या संपूर्ण प्रोफाईलचीही माहिती घेण्यात आली.. तर तब्बल १० कोटी लोकांची मतं जाणून घेतली.