रविवार, ऑगस्ट 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महायुतीच्या जागा कमी होणे ही कर्माची फळे जरांगे पाटील यांची टीका

by Gautam Sancheti
जून 3, 2024 | 3:41 am
in संमिश्र वार्ता
0
manoj jarange e1706288769516

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जालनाः ‘एक्झिट पोल’वर मी राजकारणात नसल्याने कसा बोलणार, असा प्रतिप्रश्न मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केला. मी नाव घेऊन कोणाला पाडा म्हटले नाही. मी मराठ्यांना तुमच्या मताची किंमत केली पाहिजे, भीती वाटली पाहिजे, असे मी म्हटले होते. राज्यात महायुतीच्या जागा कमी होणार असतील, तर ती त्यांच्या कर्माची फळे आहेत. नियतीला सहन होत नाही, हा निसर्गाचाच नियम आहे, असा टोला त्यांनी लगावला.

जरांगे पाटील म्हणाले की, मी पंतप्रधानांवर टीका केली नाही. त्यांचेच काही नेते मराठा समाजाचा द्वेष करतात. तिसऱ्यांदा सत्ता येण्याची चिन्हे दिसू लागताच भीती दाखवत आहेत का? लोकसभा निवडणुकीत मोदी यांना इथेच राहण्याची वेळ भाजपच्या चार दोन लोकांमुळे आली. जे सत्य आहे, ते मी सांगितले. राज्यात सर्वच जातींचे हाल आहेत. यापुढे सर्वंच जातीचा स्वाभिमान जागा होणार आहे. यांनी काही जातीचे नेते आणि काही जाती संपवल्या आहेत. त्यांचे काही नेते द्वेष करतात. काड्या करणे, आंदोलन फोडणे, खोट्या केसेस करणे, हल्ले करणे आदीतून सत्तेचा पदाचा दुरुपयोग करतात.

आंदोलन मोडण्यासाठी सरकारकडून खोड्या सुरू असल्याचा आरोप करून ते म्हणाले, की सर्व जातींना यांनी फसवलं आहे. धनगर, बंजारा, लिंगायत सर्वांची परिस्थिती सारखीच आहे. अन्यायाला वाचा फोडायला जनतेला लोकशाहीत मतदानरूपी हत्यार हातात घ्यावे लागले. गोड बोलून सत्ता घ्यायची आणि जनतेवर पुन्हा अन्याय करायचा. आम्हाला कोणाच्या गुलालाचा आनंद नाही. कोणी निवडून आला काय आणि कोणी पडला काय? आम्हाला फक्त आरक्षणाच्या गुलालात आनंद आहे. मी आंदोलनावर ठाम आहे.

गाव पातळीवर एकही ओबीसी बांधव मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आंदोलन मोडण्यासाठी खोड्या न करता गोडी गुलाब्याने आंदोलन हाताळावे. सग्यासोयऱ्याची अंमलबजावणी करावी. नाहीतर २८८ विधानसभा मतदारसंघात आम्ही वेगवेगळ्या जाती धर्माचे उमेदवार उभे करू, असा इशारा त्यांनी दिला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंतप्रधानांनी ‘रेमल’ चक्रीवादळाच्या प्रभावाचा घेतला आढावा…गृह मंत्रालयाला दिले हे निर्देश

Next Post

देशातील उष्णतेची लाट आणि मोसमी पावसाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची आढावा बैठक

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Screenshot 20240525 173349 Collage Maker GridArt

देशातील उष्णतेची लाट आणि मोसमी पावसाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची आढावा बैठक

ताज्या बातम्या

Untitled 2

ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची धमकी…नेमकं घडलं काय

ऑगस्ट 3, 2025
unnamed 6

नाशिक जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेला सुरवात…विरल आणि अन्यना यांची उत्तम कामगिरी

ऑगस्ट 3, 2025
crime 12

मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले…वेगवेगळया भागातील दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

ऑगस्ट 3, 2025
image0037LA4 e1754183811326

जळगावात जमले भारताचे भावी बुद्धिबळपटू: ११ वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेला सुरुवात

ऑगस्ट 3, 2025
IMG 20250802 WA0467 e1754183550323

मठाच्या माधुरी हत्तीणी स्थलांतराबाबत वनताराने केली आपली भूमिका स्पष्ट….

ऑगस्ट 3, 2025
3 1024x683 1

दीडशे दिवस उपक्रमात होणार अनुकंपाच्या सर्व पदांची भरती…अतिरिक्त जिल्हाधिकारी होणार आरडीसी

ऑगस्ट 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011