पाटणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बिहारमध्ये भाजप खासदाराच्या ताफ्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारातून खासदार सुखरुप बचावले आहेत.
पाटणा जिल्ह्यातील पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार, खासदार रामकृपाल यादव यांच्या ताफ्यावर गोळीबार करण्यात आला. मसौढी येथील तनेरी परिसरात गोळीबाराची ही घटना घडली. गोळीबाराची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून त्यांनी तपास सुरू केला आहे.
पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघात रामकृपाल यादव विरुद्ध मीसा भारती अशी लढत झाली. मीसा भारती या बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांच्या कन्या आहेत. गेल्या निवडणुकीत मीसा भारती यांचा यादव यांनी पराभव केला होता. दोन्ही नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगले होते. यादव यांनी मीसा भारती यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.