नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगावमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास माजी नगर नगरसेवक अजीज लल्लू व त्यांच्या मुलावर मोटार सायकलवरून आलेल्या तीन ते चार जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्लात अजीज लल्लू गंभीर जखमी झाले आहेत. गेल्या आठवड्यात माजी महापौर अब्दुल मालिक यांच्यावर गोळीबाराची झाल्याची घटना ताजी असताना आता लल्लू यांच्यावर झालेल्या हल्ल्या झाला आहे. त्यामुळे मालेगाव शहर हादरले आहे.
या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मालेगावच्या हजार खोली भागातील मदिना चौकात हा हल्ला करण्यात आला. कौटुंबिक वादातून हा हल्ला झाल्याचे बोलले जात असून अजिज लल्लू यांच्या डोक्याला, चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली तर हाताची बोटेही कापण्यात आली. त्यांच्यावर मालेगावमध्ये खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.