मंगळवार, जुलै 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

खासदार प्रज्वल रेवण्णा विमानतळावर उतरताच पोलिसांनी केली अटक….

by India Darpan
मे 31, 2024 | 11:48 am
in संमिश्र वार्ता
0
Untitled 121

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बंगळुरु : लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी प्रजल्व रेवण्णा जर्मनीतून भारतात दाखल होताच त्याला ‘एसआयटी’ने अटक केली. बंगळुरुच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रज्वल पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्याला गजाआड केले. प्रज्वलने २७ एप्रिलला देश सोडून पलायन केले होते. हसन लोकसभा मतदारसंघातील मतदान संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो फरार झाला होता. ‘एसआयटी’ला ‘इंटरपोल’ने प्रज्वल रेवण्णाच्या भारतात येण्याबाबतची माहिती दिली होती.त्यामुळे बंगळुरु पोलिसांनी प्रज्वलच्या अटकेसाठी पूर्वतयारी करून ठेवली होती. ‘एसआयटी’ने प्रज्वल भारतात पोहोचताच अटक केली. प्रज्वल बंगळुरु ‘एसआयटी’च्या कोठडीत आहे.

लोकसभा निव़णुकीच्या रणधुमाळीतच गेल्या महिन्यात प्रज्वल याच्यावर लैंगिक छळ, शेकडो व्हिडिओ रेकॉर्डिंग, धमकावणे आणि कट रचल्याचा आरोप करण्यात आला होता. रेवण्णाशी संबंधित अनेक व्हायरल व्हिडिओ २६ एप्रिल रोजी हसनमध्ये शेअर करण्यात आले होते. या पेन ड्राईव्हमध्ये २९०० हून अधिक व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आला होता. हे व्हिडिओ प्रज्वल यांनी रेकॉर्ड केले होते. यानंतर ते ‘सोशल मीडिया’वर शेअरही झाले. त्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण, तो परदेशात फरार झाला.

त्यानंतर बंगळुरु पोलिसांच्या विनंतीवरून ‘इंटरपोल’ने प्रज्वलला ब्लू कॉर्नर नोटीस बजावली होती. ३१ मे रोजी मध्यरात्री १२.४९ वाजता प्रज्वलचे विमान बंगळुरु विमानतळावर दाखल झाला त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. विमानतळावर बंदोबस्त वाढवण्यात आला होता. महिला अत्याचाराचे प्रज्वलचे व्हिडीओ सार्वजनिक झाले. तीन पीडितांनी त्याच्या विरुद्ध बलात्काराच्या तक्रारी दाखल केल्या. त्याचे प्राथमिक पुरावे प्राप्त झाल्यानंतर ‘एसआयटी’ने आणखी पुरावे गोळा केले असून ठिकाणांची पडताळणी केली जात आहे.

राज्य महिला आयोगाच्या प्रमुख नागलक्ष्मी चौधरी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डीजीपी यांना पत्र लिहिल्यानंतर कर्नाटक सरकारने या प्रकरणाची दखल घेतली. महिला आयोगाने मुख्यमंत्री आणि पोलिसांना लिहिलेल्या पत्रात व्हिडिओ रेकॉर्ड आणि वितरित करणाऱ्यांवर तपास आणि कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर कर्नाटक सरकारने २७ एप्रिल रोजी ‘एसआयटी’ स्थापन करून तपासाचे आदेश दिले होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होणार…काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्हिडिओ पोस्ट करत व्यक्त केला विश्वास

Next Post

आरोग्य विमा धारकांसाठी आयआरडीएने जारी केले हे महत्त्वपूर्ण परिपत्रक

India Darpan

Next Post
IMG 20240531 WA0167

आरोग्य विमा धारकांसाठी आयआरडीएने जारी केले हे महत्त्वपूर्ण परिपत्रक

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011