गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नंदिनी नदीकिनारी २३ ठिकाणी ५५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कामाला सुरुवात…चारुशीला गायकवाड यांनी दिली ही प्रतिक्रिया

by India Darpan
मे 30, 2024 | 3:14 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240530 WA0187 e1717062193571

शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनच्या प्रयत्नांना यश
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नंदिनी नदीचे संरक्षण व्हावे आणि प्रदूषण रोखले जावे, यासाठी या नदीच्या दोन्ही किनारी उंटवाडी ते गोविंदनगरपर्यंत २३ ठिकाणी पंच्चावन्नहून अधिक कॅमेरे बसविण्याचे काम स्मार्ट सिटीने सुरू केले आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांना सावध करता यावे, यासाठी ५३ ध्वनीक्षेपकाचीही सुविधा देण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनच्या प्रयत्नांना यश आले आहे. सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांनी महापालिका व स्मार्ट सिटीचे आभार मानले आहे. प्रदूषण रोखण्यासाठी नदीकिनारी सीसीटीव्हीची यंत्रणा कार्यान्वित करणे हा राज्यातील पायलट प्रोजेक्ट ठरणार आहे.

IMG 20240530 WA0186

नंदिनी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात घाण व कचरा टाकून प्रदूषण केले जाते, वाळू उपसाही होतो. मद्यपी, गर्दुल्ले, गुन्हेगार येथे येतात. नंदिनीमुळे गोदावरीचेही प्रदूषण वाढते. नागरिकांना गुन्हेगारीचा त्रास होतोच; परंतु त्यांचे आरोग्यही धोक्यात येते. प्रदूषण रोखण्याला मदत व्हावी, नदी व परिसरातील नागरिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी नदीच्या दोन्ही किनारी उंटवाडी ते गोविंदनगरपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, अशी मागणी शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनने बाबासाहेब गायकवाड (देशमुख), चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने महापालिका आयुक्त आणि स्मार्ट सिटीकडे ७ व ८ डिसेंबर २०२१ रोजी केली होती. सततच्या पाठपुराव्यानंतर महापालिका आयुक्तांनी हा विषय १६ मार्च २०२२ ला स्मार्ट सिटीकडे पाठविला. स्मार्ट सिटी संचालक मंडळाने २३व्या बैठकीत २४ सप्टेंबर २०२२ रोजी या विषयाला अंतिम मंजुरी दिली. आता सिटी सेंटर मॉलची मागची बाजू, महालक्ष्मी मंदिर, म्हसोबा महाराज मंदिर, दोंदे पूल, बाजीरावनगर, मिलिंदनगर, उंटवाडी, छत्रपती संभाजी महाराज चौक, सिटी सेंटर मॉल चौकातील पूल, गोविंदनगर, मुंबई नाक्यापर्यंत अशा एकूण २३ ठिकाणी ५५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. यात बुलेट, पीटीझेड, मल्टीसेन्सर या प्रकारच्या कॅमेर्‍यांचा समावेश आहे. पूरपरिस्थितीसह आपत्कालीन स्थितीत नागरिकांना सावध करता यावे, यासाठी ५३ ध्वनीक्षेपक बसविण्यात येत आहेत. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर नंदिनी नदीचे प्रदूषण रोखण्याला मोठी मदत होणार आहे. सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, धवल खैरनार, संगीता देशमुख, फकिरराव तिडके, विठ्ठलराव देवरे, बापूराव पाटील, भालचंद्र रत्नपारखी, ओमप्रकाश शर्मा, बाळासाहेब देशमुख, दिलीप निकम, निलेश ठाकूर, यशवंत जाधव, मनोज वाणी, दिलीप दिवाणे, अशोक पाटील, अनंत संगमनेरकर, बाळासाहेब राऊतराय, आनंदराव तिडके, सतीश मणिआर, शैलेश महाजन, भारती देशमुख, मीना टकले, वंदना पाटील, दीपक दुट्टे, प्रथमेश पाटील आदींसह रहिवाशांनी महापालिका व स्मार्ट सिटीचे आभार मानले आहे.

संपूर्ण शहरात हा प्रकल्प राबवावा
प्रभाग २४ मधील नागरिकांच्या सहकार्यामुळे हे काम करण्याला बळ मिळाले. दक्षिणगंगा पवित्र गोदावरीसह उपनद्यांचे प्रदूषण रोखणे, जतन व संवर्धन होणे आवश्यक आहे. यासाठी नदीकिनारी सीसीटीव्ही लावण्याचा हा प्रकल्प नाशिक शहरात सर्व ठिकाणी अंमलात आणला जावा. नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्याबरोबरच आपत्कालीन परिस्थितीतही याची मदत होणार आहे.
चारुशीला गायकवाड (देशमुख)
(शिवसेना कार्यकर्त्या, कर्मयोगीनगर, नाशिक)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत ५२ वर्षीय पादचारी ठार…उंटवाडी भागातील घटना

Next Post

सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या क्रेटा कारसह दुचाकी चोरीला…पंचवटी पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल

India Darpan

Next Post
प्रातिनिधिक फोटो

सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या क्रेटा कारसह दुचाकी चोरीला…पंचवटी पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011