इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्यात दहावीचा निकाल लागल्यानंतर अनेक गुणवंताचे कौतुक होत असतांना बीडमध्ये तब्बल १० वेळा दहावीला नापास झालेल्या मुलाने परिक्षेत यावेळेस यश मिळवल्यामुळे त्याचे कौतुक होत आहे. विशेष म्हणजे तो पास झाल्यानंतर त्याची थेट गावक-यांनी मिरवणूक काढून आनंद व्यक्त केला.
कृष्णा सायस मुंडे असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. ११ व्या प्रयत्नात त्याने दहावीच्या परिक्षेत यश मिळवले. तब्बल १० वेळा दहावीला नापास झाल्यानंतर केवळ मुलाने वडिलांच्या इच्छेसाठी जिद्दीने पेटून ११ व्या वर्षी हे यश मिळवले. यानंतर संपूर्ण गावाने त्यांची थेट मिरवणूकच काढली. या विद्यार्थ्याची सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे.
कृष्णा हा पण परळीतल्या डावी येथील राहणारा आहे. या गावाने डोक्यावर उचलून धरलंय. कारण निराश न होता सतत प्रयत्न करणाऱ्या कृष्णाच्या जिद्दीचं कौतुक गावक-यांना आहे.