नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ओबीसी संघर्ष समिती आयोजित सुवर्णकार समाजचा सर्वशाखीय वधू- वर परिचय मेळावा कोहिनुर इंग्लिश स्कूलमध्ये उत्साहात पार पडला. तसेच मंत्री छगन भुजबळ यांना ओबीसी १२ बलुतेदार यांचे राजे म्हणून त्यांना सुवर्णकार समाजातर्फे स्मृतिचिन्ह देण्यात आले. यावेळी वर्तमान काळातील परिस्थतीमध्ये ओबीसी समाजाने एकत्रित येऊन व्यवस्थेमध्ये अस्तित्व दाखण्याची गरज असे प्रतिपादन मेळावास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या ओबीसी समाजाचे संघटक बाळासाहेब कर्डक यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर समता परिषेदेचे दिलीप खैरे, आयोजक गजू घोडके, अखिल भारतीय सुवर्णकार समाजाच्या अध्यक्षा पुष्पा सोनार, शाम बिरारी, प्रकाश थोरात, संजय मंडलिक, जितेंद्र भावे, मिलिंद सोनार, कौशल वाघरकार, दिलीप सोनार, रवी मैंद, कृष्णा बागुल, नाना पवार, राजेंद्र शहाणे, राजाभाऊ दिंडोरकर, राजेंद्र कुलथे,चारुहास घोडके, भास्कर मैंद आदी उपस्थित होते. जितेंद्र भावे दिलीप सोनार मिलिंद सोनार राजेंद्र कुलथे ओबोसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांना ‘ओबोसी राजे’ असलेली प्रतिकृती देण्यात आली.
कार्यक्रमांमध्ये अपंग विधवा आणि फारकत या विषयावरती तसेच यापुढे सुवर्णकार समाजातील सर्व नागरिकांनी आपल्या आडनावापुढे सोनार लावावा असा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी गजूभाऊ घोडके यांना समाज भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी अहिर सुवर्णकार, लाड सुवर्णकार, देशस्थ सुवर्णकर पोट शाखेतील १०० उप वधू – उपवरांचा परिचय करून देण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किरण सोनार आणि प्रतिभा सोनार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाळासाहेब दुसाने, अर्चित घोडके आणि इतरांनी परिश्रम घेतले.