इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कोलकाता: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची बैठक १ जून रोजी होणार आहे. या बैठकीत इंडिया आघाडीचे घटक पक्ष सामील होणार आहे. तृणमूल काँग्रेसलाही या बैठीकचे आमंत्रण दिले आहे. पण, ममता बॅनर्जी या बैठकीला उपस्थितीत राहणार नाही. यामागचे नेमकं कारण त्यांनी दिले आहे.
ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, इंडिया आघाडीची १ जून रोजी बैठक होत आहे. मी त्यांना सांगितले आहे की मी त्यात उपस्थित राहू शकत नाही कारण त्याच दिवशी पश्चिम बंगालमध्ये १० जागांसाठी निवडणुका आहेत. पंजाब, बिहार आणि तेथे यूपीमध्ये १ जूनला निवडणुका आहेत… एकीकडे चक्रीवादळ आहे आणि दुसरीकडे निवडणुका आहेत, मला सध्या सर्व काही करायचे आहे.