गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

एसएमएस घोटाळेबाजांवर दूरसंचार विभाग आणि केंद्रीय गृहमंत्रालयाने केली ही कारवाई

by India Darpan
मे 27, 2024 | 7:42 pm
in संमिश्र वार्ता
0
image001P12V

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बनावट एसएमएसद्वारे संभाव्य फसवणूकीपासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी दूरसंचार विभागाने केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सहकार्याने संचार साथी उपक्रमाच्या माध्यमातून निर्णायक कारवाई केली आहे.

सायबर गुन्हे करण्यासाठी बनावट संदेश पाठवणाऱ्या आठ एसएमएस हेडर्स माहिती गृहमंत्रालयाच्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने(I4C), उपलब्ध करून दिली आहे. दूरसंचार विभागाने केलेली कारवाईः या ठिकाणी ही बाब विचारात घेण्यात आली की गेल्या तीन महिन्यात या आठ हेडर्सचा वापर करून 10,000 पेक्षा जास्त बनावट संदेश पाठवण्यात आले. या आठ एसएमएस हेडर्सची मालकी असणाऱ्या प्रमुख संस्थांचा समावेश काळ्या यादीत करण्यात आला आहे.

या प्रमुख संस्थाच्या मालकीच्या असलेल्या सर्व 73 एसएमएस हेडर्स आणि 1522 एसएमएस आशय पट्टिकांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. या प्रमुख संस्था, एसएमएस हेडर्स किंवा पट्टिका यांच्यापैकी कोणाचाही आता एखाद्या दूरसंचार ऑपरेटरला एसएमएस पाठवण्यासाठी वापर करता येणार नाही. दूरसंचार विभागाने या संस्थांना काळ्या यादीत टाकून नागरिकांची आणखी संभाव्य फसवणूक टाळली आहे. सायबर गुन्ह्यांपासून नागरिकांचे संरक्षण करण्याच्या वचनबद्धतेचा दूरसंचार विभागाने पुनरुच्चार केला आहे.

सायबर गुन्ह्यांसाठी आणि आर्थिक घोटाळ्यांसाठी दूरसंचार संसाधनांच्या गैरवापराला प्रतिबंध करण्यात दूरसंचार विभागाला मदत करण्यासाठी नागरिकांनी संशयित घोटाळेबाजांकडून होणाऱ्या संभाषणाची तक्रार संचार साथीवरील चक्षू सुविधेवर दाखल करावी.

टेलिमार्केटिंग एसएमएस/कॉल्सविषयी
टेलिमार्केटिंगसाठी मोबाईल क्रमांकांना प्रतिबंधः टेलिमार्केटिंग व्यवहार करण्यासाठी मोबाईल क्रमांकांचा वापर करण्याची अनुमती नाही. जर एखादा ग्राहक त्याच्या टेलिफोन कनेक्शनचा वापर प्रमोशनल संदेश पाठवण्यासाठी करत असेल तर पहिल्या तक्रारीच्या आधारे त्याचे कनेक्शन खंडीत करण्यात येईल आणि त्याचे नाव आणि पत्ता यांचा समावेश दोन वर्षांकरिता काळ्या यादीत करण्यात येईल.
टेलिमार्केटिंग कॉल्स ओळखणेःटेलिमार्केटिंग कॉल्स त्यांच्या सुरुवातीच्या क्रमांकावरून ओळखता येतातः 180,140 आणि 10 आकडी क्रमांकांना टेलिमार्केटिंग करण्याची अनुमती नाही. स्पॅमची तक्रार करणेः स्पॅमची तक्रार करण्यासाठी 1909 क्रमांक डायल करा किंवा डीएनडी(डू नॉट डिस्टर्ब) सेवा वापरा.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आरबीआयाने ICICI बँकला १ कोटी तर येस बँकेला ठोठावला इतक्या लाखाचा दंड

Next Post

इंडिया आघाडीची १ जूनला बैठक…या कारणाने ममता बँनर्जी अनुपस्थितीत राहणार

India Darpan

Next Post
mamata

इंडिया आघाडीची १ जूनला बैठक…या कारणाने ममता बँनर्जी अनुपस्थितीत राहणार

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011