नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– आडगाव शिवारात नव्याने बांधकाम सुरू असलेल्या साईटवर वाळूची पाटी डोक्यावर घेऊन जीना चढणा-या मजूराचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. गौतम सखाराम काळे (४० रा. सैलाणी बाबा दसक ना.रोड) असे मृत मजूराचे नाव आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
काळे शनिवारी (दि.२५) आडगाव शिवारात नव्याने सुरू असलेल्या बांधाकाम साईटवर कामास गेले होते. तळमजल्यावरून पाटीत वाळू घेऊन ते बहूमजली इमारतीचा जीना चढत असतांना अचानक पायरीवर पाय घसरून पडल्याने ही घटना घडली.
या घटनेत डोक्यास वर्मी मार लागल्याने मित्र मोहम्मद उसमान यांनी तातडीने नजीकच्या मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता मध्यरात्री उपचार सुरू असतांना डॉ. प्रतिचा बडोले यांनी त्यास तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार मगर करीत आहेत.