नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोत सोशल मीडियावर फोटो अपलोड करून तरूणीची बदनामी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. इन्स्टाग्रामवर बनावट आयडी तयार करून हा प्रकार करण्यात आला असून, अश्लिल कमेंट करून युवतीची समाजात चारित्र्याविषयी बदनामी केली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात विनयभंगासह आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सुलतान शहा (पूर्ण नाव पत्ता नाही) असे युवतीची बदनामी करणा-या संशयिताचे नाव आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीत. संशयिताने इस्टाग्रामवर बनावट आयडी तयार करून त्याद्वारे गेल्या गुरूवारी (दि.२३) तरूणीचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले.
या फोटोंना त्याने अश्लिल कमेंट करून समाजात चारित्र्याविषयी बदनामी केल्याचे म्हटले आहे. अधिक तपास निरीक्षक सुनिल पवार करीत आहेत.