इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने राजीनामा घ्यावा अशी मागणी काँग्रेसचे पुणे येथील आमदार रविंद्र धंगेकर यांनी केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, सूनमध्ये घडलेले ललित पाटीलचे ड्रग्स प्रकरण असो की रुग्णवाहिका खरेदीतील गैरव्यवहार असो अनेक आंदोलने होऊन देखील अधिकारी निलंबित करण्यात आले नाही पण जे प्रशासकीय अधिकारी मंत्र्यांना पाहिजे तसे नियमबाह्य पद्धतीने कामकाज करत नसतील तर त्यांचे थेट निलंबन करायचे, असा नवा कारभार राज्य सरकारच्या आरोग्य विभागात सुरू आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी .भगवान पवार यांच्या बाबतीत हा प्रकार घडला असून सरकारच्या आरोग्य विभागाने त्यांना कुठलेही ठोस कारण न देता थेट निलंबित केले आहे. ते दबावाला बळी पडले नाहीत म्हणून त्यांना थेट घरी पाठवण्याची घटना सरकारसाठी लाजिरवाणी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.