इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आयपीएलच्या १७ व्या मोसमातील अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सची टीम किंग ठरली. केकेआरला विजयासाठी सनरायजर्स हैदराबादने ११४ धावांचं आव्हान दिले होते. पण, केकेआरने हे आव्हान १०.३ ओव्हरमध्ये २ विकेट्स गमावून सहज पूर्ण केले. सनरायजर्स हैदराबादवर केकेआरने ८ विकेट्सने विजय मिळवला आहे.
या साामन्यात वेंकटेश अय्यर याने केकेआरसाठी नाबाद ५२ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर रहमानुल्लाह गुरुबाज याने ३९ धावा केल्या. सुनील नरीन आणि कॅप्टन श्रेयस अय्यर या दोघांनी ६ धावा केल्या. श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात, गौतम गंभीर, चंद्रकांत पंडित आणि अभिषेक नायर या अनुभवी त्रिकुटाच्या मार्गदर्शनात कोलकाता नाईट रायडर्सने हा विजय मिळवला.
या विजयानंतर केकेआरचा मालक अभिनेता शाहरुख खान याने प्रत्येक खेळाडूंचे अभिनंदन करत विजयाच्या शुभेच्छा दिल्या. शाहरुखने या दरम्यान गौतम गंभीरचं खास अभिनंदन केले. शाहरुखने या वेळेस गंभीरच्या कपाळ्यावर पप्पी दिली. गंभीरची पप्पी घेतानाचा शाहरुखचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कोलकाता नाइट राइडर्सचे श्रेयस अय्यर (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज़ (विकेटकीपर), सुनील नरीन, वेंकटेश अय्यर, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमनदीप सिंह, मिचेल स्टार्क, वैभव अरोडा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती या खेळाडूंनी या सामन्यात चांगली कामगिरी केली.