चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील निमोण गावात शेतीचे सपाटी करणाचे काम सुरू असताना डंपर विहिरीत पडून चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. पावसाळा सुरू होणार असल्याने शेतकरी शेतीच्या कामात गुंतले आहे.
निमोण गावातील एका शेतात सपाटीकरण करण्यासाठी माती टाकत असताना चालकाला विहिरीचा अंदाज न आल्याने डंपर थेट विहिरीत पडला. दुर्दैवाने चालक अक्षय दळवी याचा यात मृत्यू झाला. चांदवड पोलिस अधिक तपास करीत आहे.