मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– मालेगाव जवळ असलेल्या झोडगे येथील भारत पेट्रोल कंपनीच्या पेट्रोल पंपावर लुटीच्या उद्देशाने मोटार सायकलवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी मालक कुठे आहे. पंधरा पेटी द्या अशी मागणी करत पिस्टलमधून गोळीबार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.
हल्लेखोरांनी पंपावरील कर्मचाऱ्यांशी झटापट केले. त्याच्या कानावर पिस्टल लावत धमावले व गोळीबार केला. सुदैवाने त्यात तो थोडक्यात बचावला. त्यांनी त्याचा मोबाईल हिसकावून उद्या परत येतो २० लाख रुपये तयार ठेवा असा दम देत धुळ्याच्या दिशेने पोबारा केला. हल्लाचा हा संपूर्ण थरार सिसिटीव्हीमध्ये कैद झाला आहे. घटनास्थळी माहिती मिळताच मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेज आधारे पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरु केला आहे. सदरचा पेट्रोल पंप मनमाडचे भाजप नेते पंकज खताळ यांच्या मालकीचा असल्याचे समजते…