इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राजकोटमधील आगीची दुर्घटना हृदय पिळवटून टाकणारी असून या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो असे गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी सांगितले.
ते म्हणाले की, राज्य सरकार मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये देणार आहे.अशी घटना पुन्हा होणार नाही याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. या कार्यक्रमात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा केला जाणार नाही. या संदर्भात, एक विशेष तपास पथक (एसआयटी) तयार करण्यात आले आहे आणि संपूर्ण घटनेचा तपास सोपवण्यात आला आहे.