इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह सोमवार, २३ ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे नॅशनल कोऑपरेटिव्ह फॉर एक्सपोर्ट्स लिमिटेड (एनसीईएल) द्वारे आयोजित ‘सहकारी निर्यातीवरील राष्ट्रीय परिसंवादा’ला संबोधित करतील. अमित शाह एनसीईएलचे बोधचिह्न, संकेतस्थळ आणि माहितीपत्रकही जारी करतील आणि एनसीईएल सदस्यांना सदस्यत्व प्रमाणपत्रांचे वितरण करतील.
या परिसंवादात सहकारी संस्थांना निर्यात बाजारांशी जोडण्याच्या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन, भारतीय कृषी-निर्यातीच्या क्षमता आणि सहकारी संस्थांना उपलब्ध असलेल्या संधी यांसह विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. नॅशनल कोऑपरेटिव्ह फॉर एक्सपोर्ट्स लिमिटेड ही २५ जानेवारी रोजी, बहु-राज्य सहकारी संस्था अधिनियम, २००२ अंतर्गत नोंदणीकृत सहकारी क्षेत्रातील निर्यातीसाठी नव्याने स्थापन झालेली व्यापक संस्था आहे.
या संस्थेच्या कार्यक्षेत्रात कृषी आणि कृषिसंबद्ध क्रियाकलाप तसेच हातमाग आणि हस्तकला वस्तूंचा समावेश होतो. या संस्थेच्या अंतर्गत २०२५ पर्यंत मोठ्या प्रमाणात सहकारी संस्थांची नोंदणी करून महसूल सध्याच्या २१६० कोटी रुपयांच्या स्तरावरून दुप्पट करण्याचे तिचे उद्दिष्ट आहे.