नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक मुंबई- आग्रा महामार्गावर रायगड नगर जवळ टोमॅटो वाहतूक करणारी पिकअप गाडी पलटी झाली आहे. या अपघातात दोन जण जखमी झाले आहे. शनिवारी सायंकाळी हा अपघात झाला. मुंबईकडून नाशिककडे जाणा-या पिकअपच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली.
या अपघातात पिकअप क्रमांक MH 04.DD.5795 या गाडीचा अपघात झाला. या अपघातात आदी केदु जाधव (२२) रा. पिंपळगाव बसवंत, सागर रमेश गांगुर्डे (२५) रा. चिखल आंबे पाडेगाव हे जखमी झाले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच गोंदे फाटा स्पॅाटवर उभी असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत अॅम्बुलन्स लगेचच अपघात स्थळी पोहोचली. त्यानंतर जखमींना तात्काळ नाशिक सिव्हिल हॅास्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.