इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पश्चिम बंगालमध्ये झारग्राम येथील भाजप उमेदवार प्रणत टुडू यांच्यावर आज हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. भाजपचे नेते व टूडू हे पळत पळत बाहेर पडले. यावेळी सुरक्षा जवानांनी त्यांना वाचवले. आज लोकसभा मतदारसंघातील मोंगलापोटा येथील बूथ क्रमांक २०० ला भेट देत असताना त्यांच्यावर हल्लेखोरांनी हा हल्ला केला.
या दगडफेकीनंतर भाजपने तृणमुल काँग्रेसवर आरोप केला आहे. टुडू यांनी सांगितले की, मिदनापूर जिल्ह्यातील गरबेटा भागात त्यांच्या कार्यकर्त्यांवर दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर भाजपने बंगालमध्ये ममता बॅनर्जी लोकशाहीची हत्या करत आहेत. आता, टीएमसीच्या गुंडांनी भाजपच्या झारग्राम (आदिवासी जागा) उमेदवार आणि एबीपी आनंदाच्या ताफ्यावर हल्ला केला. लोकांना मतदान करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न असूनही, पश्चिम बंगालमध्ये देशभरात सर्वाधिक मतदान झाले आहे. लोक टीएमसीला बाहेर काढण्यासाठी मतदान करत आहेत.