इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय निवडणूक आयोगाने नाशिक विभागाची शिक्षक मतदार संघाच्या पुढे ढकललेल्या निवडणूकीचा कार्यक्रम पुन्हा जाहीर केली आहे. या विभागात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे. नाशिकप्रमाणेच मुंबई विभागात शिक्षक व पदवीधर, कोकण विभागात पदवीधर मतदार संघाची निवडणूक होणार आहे.
या निवडणुकीसाठी ३१ मे रोजी अधिसूचना जारी होणार आहे. तसेच ७ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. १० जून रोजी अर्जाची छाननी होणार आहे. तर १२ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. २६ जून रोजी सकाळी ८ ते ४ वेळेत मतदान होणार आहे. १ जूलै रोजी मतमोजणी होणार आहे. ५ जूलै पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
नाशिक विभागात नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे. या मतदार संघातून ठाकरे गटाचे आमदार किशोर दराडे हे निवडून गेले होते. त्यांची मुदत ७ जुलै पर्यंत आहे. या मतदार संघात ७० हजार शिक्षक मतदार आहे.