मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनमाड येथील युनियन बँकेच्या शहर शाखेत झालेल्या घोटाळा प्रकरणात आरोपी संदीप देशमुख याला पोलिसांनी चाळीसगाव येथे अटक केली आहे. युनियन बँकेचं मनमाड शहर शाखेत फिक्स डिपॉजिट खातेदारांचे कोट्यावधी रुपयांचा अपहार करून तो फरार झाला होता. चाळीसगाव येथून त्याला करण्यात आली अटक. फसवणूक झालेल्या खातेदारांनी आज सलग दुसऱ्या दिवशी बँके केली मोठी गर्दी केली आहे.
या बँकेत हा घोटाळा उघड झाल्यानंतर सर्व स्टाफची तडकाफडकी बदली केली. त्यानंतर नवीन आलेल्या कर्मचा-यांनाही काम करतांना फसवणूक झालेल्या खातेदाराचा सामना करावा लागत आहे. या प्रकरणी कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली असून आरोपीला अटक केल्यानंतर आता त्याने नेमकं काय केले हे समोर येणार आहे.