नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकच्या गिरणा धरणातून आज सकाळी सहा वाजता जळगाव जिल्ह्यातील भडगाव, पाचोरा, दहिगाव बंधारा, कानालदा यासाठी पिण्याचे चौथे आवर्तन सोडण्यात आले आले आहे. दोन हजार क्यूसेक्स वेगाने पाणी गिरणा नदी पत्रातून वाहत असल्याने नदी काठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. हे पाणी फक्त पिण्यासाठी असल्याने नदी काठच्या शेतकऱ्यांनी शेतीचे पंप बंद ठेवण्याचे आदेश पाटबंधारे विभागाने दिले आहे.