नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुन्ह्यात अटक न करता कोर्टात पाठवून मदत करण्यासाठी पाच हजार रुपयाची लाच घेतांना लासलगाव पोलीस स्टेशनचे पोलिस नाईक कैलास बिडगर हे लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकले. पंचांसमक्ष दहा हजार रुपयाची लाचेची मागणी करून तडजोडी अंती पाच हजार रुपये घेतांना ते सापडले.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, यातील तक्रारदार हे डोंगरगाव तालुका निफाड येथील राहणारे असून ते शेती व्यवसाय करतात. त्यांच्याविरुद्ध लासलगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक 18/5/2024 रोजी गु.र. नंबर 115/2024 कलम 324 504 506 भादवि प्रमाणे दाखल झालेला असून आलोसे हे सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी आहेत. या गुन्ह्यात तक्रारदार यांना अटक न करता कोर्टात पाठवून मदत करण्यासाठी आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडे पंचांसमक्ष दहा हजार रुपयाची लाचेची मागणी करून तडजोडी अंती पाच हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारली. म्हणून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे
लाचेचा यशस्वी सापळा कारवाई
युनिट – नाशिक
तक्रारदार- पुरुष, 26 वर्षे
आलोसे– कैलास सदाशिव बिडगर, वय वर्षे 42 पोलीस नाईक/1503. नेम – लासलगाव पोलीस स्टेशन जिल्हा नाशिक
लाचेची मागणी दिनांक :- 23/05/2024 रोजी
लाचेची मागणी रक्कम :- 10,000/- रुपये,
तडजोडी अंती लाच मागणी करून स्वीकारली दिनांक– 23/05/2024 रोजी
*लाच स्वीकारली *-* 5,000/- रुपये
लाचेचे कारण – यातील तक्रारदार हे डोंगरगाव तालुका निफाड येथील राहणारे असून ते शेती व्यवसाय करतात.त्यांच्याविरुद्ध लासलगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक 18/5/2024 रोजी गु.र. नंबर 115/2024 कलम 324 504 506 भा द वि प्रमाणे दाखल झालेला असून आलोसे हे सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी आहेत. या गुन्ह्यात तक्रारदार यांना अटक न करता कोर्टात पाठवून मदत करण्यासाठी आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडे पंचांसमक्ष 10,000/- रुपयाची लाचेची मागणी करून तडजोडी अंती 5000/- रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारली. म्हणून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे
▶️ *आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी
मा .पोलीस अधीक्षक, नाशिक (ग्रा)
▶️ सापळा अधिकारी
अनिल बडगुजर, पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
मो.न. 8999962057
▶️ सापळा पथक–
*पोलीस हवा/ संदीप वणवे
*पोलीस शिपाई/ संजय ठाकरे
चालक पो.ना, परशुराम जाधव
सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक .