नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक व मनमाड येथे बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहे. मोठ्या प्रमाणात आयकर विभागाचे अधिकारी सात ते आठ ठिकाणी तपासणी करत असल्याची माहिती आहे. कार्यालय व घरी टाकलेल्या या धाडीत आयकर विभागाचे अधिकारी उपस्थितीत आहे. काँलेज रोड, चोपडा लॅान्सच्या मागे व मनमाडमध्ये हे छापे टाकण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
नाशिक शहरात पुन्हा एकदा आयकर विभागाच्या रडारावर बांधकाम व्यावसायिक आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी आयकर विभागाने विविध बिल्डरांच्या तब्बल ५० हून अधिक ठिकाणांवर छापे टाकण्यात होते. आयकर चुकवेगिरीसह विविध आर्थिक बेकायदा उलाढालींची दखल घेत आयकर विभागाकडून संशयास्पद ठिकाणांवर छापे टाकले जातात. गेल्यावेळी टाकलेल्या कारवाईची अद्याप माहिती आयकर विभागाने जाहीर केलेली नाही. असे असतानाच आता आयकरचे पथक पुन्हा धडकले आहे.
नाशिक शहरात दाखल झालेले पथक हे पुण्याचे असल्याचे सांगितले जाते. कालपासून आयकरचे पथक दाखल झाले. या कारवाईचा तपशील अद्याप कळू शकलेला नाही. छापे टाकलेल्या ठिकाणी आयकर विभागाची कार उभ्या आहे. तसेच मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.