इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
डोंबिवली एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत आज दुपारी भीषण स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली. या आगीत ६ जण ठार ४५ जण होरपळून गंभीर जखमी झाले आहे. कंपनीच्या बॉयलरमध्ये स्फोट झाल्याने या स्फोटाची झळ आसपासच्या इमारतींनाही बसली. या आगीनंतर अग्निशमन दलाच्या बंबांनी घटनास्थळी धाव घेतली.
या आगीत जखमींवर लगतच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. म्हात्रे पाडा, सोनार पाडा या भागांना या स्फोटाचा सर्वाधिक फटका बसला आहे. काही वर्षांपूर्वी एका कंपनीत स्फोट होऊन अनेकांचा बळी गेला होता.
डोंबिवली एमआयडीसी फेज-२ मधील अंबर केमिकल कंपनीत ही आग लागील. या आगीनंतर स्फोटानंतर परिसरात धुराचे काळे लोट पसरले.
ही कंपनी रहिवाशी भागालगत असल्यामुळे धोका आणखी वाढला आहे. ही रासायनिक कंपनी असून ही आग सर्वसामान्य आगीसारखी नाही. ती आटोक्यात आणण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या केमिकलचा फवारा मारावा लागला.