इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे अपघात प्रकरणात माजी महापौर मुरलीधर मोहळ यांनी धंगेकर यांनी केलेल्या आरोपाविरुध्द प्रतिक्रिया देतांना म्हटले होते की, लोक तुम्हाला का नाकारतात? कारण, तुमचा अभ्यास कच्चा असतो. खोटे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी तुम्ही काहीही करु शकता. आताच्या निवडणुकीतही पुणेकरांनी ते पाहिलं आणि आता या संवेदनशील प्रकरणातही तेच !कोणत्याही घटनेत पोलीस ठाणे स्तरावर एफआयआर लिहून घेतला जातो. त्यात लावलेली कलमे योग्य आहेत की नाही, हे वरिष्ठ अधिकारी तपासतात आणि मग तो न्यायालयात जातो.मंगळवारीही उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी हेच सांगितले की, या प्रकरणात कलम 304 हे पहिल्यापासून लावले आहे, म्हणजे मूळ एफआरआय दाखल करतानाच ! ही 19 तारखेचीच कॉपी तुमच्या माहितीसाठी ! कलम 304 त्यात आधीपासूनच आहे. त्यामुळे ‘साप-साप’ म्हणून ‘भुई धोपटणे’ हे धंदे सोडून द्या. पुणेकर तुम्हाला चांगलंच ओळखून आहेत असे म्हटले होते.
त्यावर आमदार रविंद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, तरी म्हंटल बिल्डरची बाजू मांडायला अजून तुम्ही कसे आला नाहीत ? कदाचित अग्रवालची बाजू मांडायला वकील कमी पडले असतील म्हणून तुम्ही ही जबाबदारी घेतली आहे. आता तुम्हाला F.I.R आणि रिमांड रिपोर्ट यातला फरक समजतो का…? आमचं पहिल्या दिवसापासून एकच सांगणे आहे की F.I.R मध्ये 304 लावण्यात आलेला नाही. का नाही लावला…? सोबत पहिली F.I.R कॉपी जोडतोय.नीट वाचून घ्या.
इथ २ कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत,त्यांच्या घरातली २ कमावते लोकं गेले आहेत त्यांचे अश्रू पुसायचे सोडून तुम्ही अजूनही पोलीस आणि बिल्डरची बाजू मांडताय….?
पुणेकर म्हणून तुम्ही पुण्याच्या जनतेसोबत राहाल अशी माझी अपेक्षा होती पण आतापासूनच बिल्डर अन पोलिसांच्या चरणी आपली निष्ठा वाहत आहात. 3-4 वाजेपर्यंत पोलिसांना माहिती असताना पब चालतात, तेव्हा कुठं गेलेलात ? गृहमंत्री तुमच्या पक्षाचे आहेत.पोलिसांनी आपले कर्तव्य बजावले असते तर हि घटना घडली नसती.