नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कुसूमाग्रज प्रतिष्ठानमध्ये कार्यक्रमानिमित्त गेलेल्या अश्विनी संजय न्याहारकर यांची पर्स चोरीला गेली. या पर्स मध्ये ११ हजार १०० रूपयांची रोकड व महत्वाची कागदपत्र होती. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्याहारकर या रविवारी (दि.१९) एका कार्यक्रमानिमित्त विद्या विकास सर्कल भागातील कुसूमाग्रज प्रतिष्ठान येथे गेल्या होत्या कार्यक्रमात शेजारील मोकळय़ा खुर्चीवर त्यांनी आपली पर्स ठेवली असता ही घटना घडली. गर्दीची संधी साधत चोरट्यांनी पर्स चोरून नेली. या पर्समध्ये ११ हजार १०० रूपयांची रक्कम महत्वाची कागदपत्र आणि बॅकेचे एटीएम कार्ड होते. अधिक तपास हवालदार खोडे करीत आहेत.
कार्यालयात शिरून चोरट्यांनी लॅपटॉपसह मोबाईल चोरीला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गंगापूररोडवरील विद्याविकास सर्कल भागात उघड्या कार्यालयात शिरून चोरट्यांनी लॅपटॉपसह मोबाईल असा सुमारे ४० हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौरव प्रदिप पगार (रा. शरद पवार मार्केट पाठीमागे,पेठरोड) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पगार यांचे विद्याविकास सर्कल भागातील ओमकार बिल्डींगमध्ये कार्यालय आहे. शनिवारी (दि.१८) सकाळी अल्पावधीसाठी ते आपल्या कार्यालयाबाहेर पडले असता ही घटना घडली.
अज्ञात चोरट्यांनी उघड्या ऑफिसमध्ये शिरून टेबलावरील लॅपटॉप व मोबाईल असा सुमारे ४० हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास पोलीस नाईक गायकवाड करीत आहेत.