बुधवार, सप्टेंबर 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपूर्व तयारीबाबत आढावा बैठक…या दिल्या सूचना

by Gautam Sancheti
मे 22, 2024 | 8:04 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240522 WA0340 1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मान्सून काळातील भूस्खलन, पूर अशा संभाव्य आपत्तीच्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येक विभागाने सतर्क राहून नियोजनबद्ध आराखडा तयार ठेवावा. संबंधित सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवावा. आपत्तीपूर्व व आपत्ती काळात आपत्ती प्रतिसाद यंत्रणा सज्ज व अद्ययावत ठेवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जलज शर्मा यांनी आज येथे दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात मान्सूनपूर्व तयारीबाबत आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीस जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, एनडीआरएफचे असिस्टंट कमांडर प्रविण धत, नाशिक महानगरपालिकेचे अपर आयुक्त प्रदीप चौधरी आणि स्मिता झगडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जिल्हा परिषद अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, कळवण – सुरगाणाचे उपविभागीय अधिकारी पुलकित सिंग, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व तयारीनिशी सज्ज राहावे. संभाव्य आपत्तीच्या काळात संपर्काच्या आवश्यक साधनांचे योग्य नियोजन करणे अत्यावश्यक असून सर्व संबंधित विभागांनी आपत्ती काळातील नियंत्रण कक्ष अद्ययावत ठेवावेत. जिल्हा, तालुका व ग्रामपंचायतस्तरावरील आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा त्वरित तयार करुन आपत्ती व्यवस्थापन काळात सर्व विभागांनी समन्वयाने सोपविलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. नैसर्गिक आपत्तीबाबत मागविलेली माहिती सर्व विभागांनी वेळेत सादर करावी. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील पंचवटी, त्र्यंबकेश्वर, वणी यासारख्या धार्मिक स्थळांसाठी मान्सून काळात विशेष लक्ष देवून नियोजन करण्यात यावे, असेही जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी यावेळी सांगितले.

आरोग्य विभागाने जलजन्य आजारांचा पुरेसा औषधसाठा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांमध्ये सर्पदंश प्रतिबंधक लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा. कार्यकारी अभियंता आणि तहसिलदार यांनी संयुक्तपणे लघु व मध्यम प्रकल्पाची पाहणी करून आवश्यकता असल्यास कार्यकारी अभियंता यांनी तात्काळ दुरूस्ती करून घ्यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने भूस्खलनाचे ठिकाणांची निश्चिती करून आवश्यक उपायययोजना कराव्यात. अवैध जाहिरात फलक हटविण्यास प्राधान्य द्यावे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सतर्कतेने काम पाहावे. महानगरपालिकेमार्फत रस्त्याच्या दुतर्फा असलेली धोकादायक झाडे व झाडाच्या फांद्यांबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना ही यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या.

या बैठकी दरम्यान जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मोहमद मुदतशीर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी त्यांच्या विभागांनी केलेल्या मान्सून पूर्व तयारीचे सादरीकरण केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अभिनेता शाहरुख खानची प्रकृती बिघडली… अहमदाबादच्या रुग्णालयात दाखल

Next Post

पुणे येथे पोर्शे कारखाली दोघांना चिरडणाऱ्या वेदांत अग्रवालचा जामीन रद्द…बालसुधार गृहात रवानगी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी प्रलोभनांपासून दूर रहावे, जाणून घ्या,बुधवार, १७ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 16, 2025
IMG 20250916 WA0355 1
स्थानिक बातम्या

नाशिकच्या आधाराश्रमातील कर्णबधिर बालकाला अमेरिकेतील दाम्पत्याने घेतले दत्तक…

सप्टेंबर 16, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात झाली ही वाढ

सप्टेंबर 16, 2025
election11
संमिश्र वार्ता

या विभागातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचा पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर…

सप्टेंबर 16, 2025
nsp 1024x305 1
राष्ट्रीय

राष्ट्रीय माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची ही आहे अंतिम तारीख….

सप्टेंबर 16, 2025
crime 1111
क्राईम डायरी

मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले…वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकल चोरीला

सप्टेंबर 16, 2025
IMG 20250916 WA0298 1
संमिश्र वार्ता

कांदा प्रश्नावर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक…दिले हे निर्देश

सप्टेंबर 16, 2025
SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिले हे निर्देश….आता या तारखेपर्यंत मुदतवाढ

सप्टेंबर 16, 2025
Next Post
GN7IRrxaAAARYDh e1716106679187

पुणे येथे पोर्शे कारखाली दोघांना चिरडणाऱ्या वेदांत अग्रवालचा जामीन रद्द…बालसुधार गृहात रवानगी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011