इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उष्माघात आणि डिहायड्रेशनमुळे अभिनेता शाहरुख खानला अहमदाबाद येथील केडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आयपीएलच्या पहिल्या क्लालिफाय सामन्यात आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी काल शाहरुख खान अहमदाबादला पोहोचला होता. आयपीएल केकेआर विरुध्द हैदराबाद सामन्यात शाहरुखच्या मालकीची टीम केकेआरचा विजय झाल्याने तो मैदानात चाहत्यांना अभिवादन करताना दिसत होता.
पण, अचानक त्याची तब्येत बिघडल्यामुळे त्याला अहमदाबाद येथील केडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.