इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक शहरात शनिवार २५ मे रोजी सकाळी ९ वाजेपासून पूर्ण दिवस व रविवार २६ मे रोजी सकाळचा संपूर्ण नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील पाणी पुरवठा होऊ शकणार नाही याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.
शहरात पाणी पुरवठा विभागातील विविध ठिकाणी पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिन्या तसेच उप वितरण वाहिन्यांची दुरुस्ती तसेच व्हॉलची दुरुस्ती , व्हॉल बदलणे इत्यादी देखभाल दुरुस्तीचे कामे पाणी पुरवठा सुरळीत होणेकामी हाती घेणे आवश्यक आहे. त्यामुळे हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.