इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
CBI ने एफसीआयचे व्यवस्थापक (गुणवत्ता) आणि दोन तांत्रिक सहाय्यकांसह चार आरोपींना ५० हजार रुपये लाच घेतांना पकडले. पंजाबमधील लुधियाना येथील मुल्लानपूर ढाका येथे एका खाजगी व्यक्तीसह चार आरोपींना या लाच प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
आरोपी व्यवस्थापक (गुणवत्ता) आणि यांनी लाच मागितल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला. ३ हजार प्रति ट्रक तक्रारदाराकडून त्याच्या तांदूळ गिरणीतील माल पासिंगच्या बदल्यात ही लाच मागीतली होती. सीबीआयने सापळा रचून व्यवस्थापक (गुणवत्ता) आणि एफसीआयचे दोन तांत्रिक सहाय्यक आणि एका खाजगी व्यक्तीला सापळ्याच्या कारवाई दरम्यान पकडले
आरोपींच्या निवासी आणि अधिकृत आवारातील पाच ठिकाणी झडती घेण्यात आली असून त्यादरम्यान दोषी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.