नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एस.टी.महामंडळाच्या इलेक्ट्रीक शिवाई बसने दिलेल्या धडकेत ८० वर्षीय वृध्द जखमी झाला. वृध्द रस्ता ओलांडत असतांना हा अपघात झाला. जखमीवर उपचार सुरू असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जगन्नाथ पांडूरंग लोखंडे असे जखमी वृद्दाचे नाव आहे. लोखंडे शिवाजी पुतळयाकडून सिन्नर फाट्याकडे जाणाºया सर्व्हीस रोडने पायी जात असतांना हा अपघात झाला. ओढा रोडकडे जाणाºया बाजूच्या दिशेने ते रस्ता ओलांडत असतांना भरधाव एमएच १२ व्हीएफ ९१७८ या इलेक्ट्रीक शिवाई बसने त्यांना धडक दिली.
या अपघातात लोखंडे जखमी झाले असून बसचालक अपघातानंतर आपल्या वाहनासह पसार झाला आहे. याबाबत शुभम लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस दप्तरी अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक बिडकर करीत आहेत.