नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टाकळीरोड भागात खिडकीतून मोबाईलमध्ये एकाने महिलेचा अश्लिल व्हिडीओ काढल्याचा प्रकार घडला. हा प्रकार लक्षात येताच महिलेने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अनुसयानगर भागात राहणा-या ३४ वर्षीय पीडितेने याबाबत फिर्याद दिली आहे. मंगळवारी (दि.२१) सकाळच्या सुमारास महिला आपल्या घरातील बाथरूममध्ये अंघोळ करीत असतांना ही घटना घडली.
खिडकीतून कोणीतरी डोकावत असल्याचे लक्षात येताच महिलेने कुटुंबियांच्या मदतीने एका १६ वर्षीय मुलास मोबाईल मध्ये व्हिडीओ काढतांना रंगेहात पकडले आहे. संशयित सोसायटीतील वॉचमनचा मुलगा असून, तो शेजारीच राहतो. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गवळी करीत आहेत.